सावंतवाडी,दि.१९ जानेवारी
सावंतवाडी नगरपरिषद कुणकेरी पाळणेकोंड धरणावर मंजुर झालेली व टेंडर प्रक्रिया पार पडून तीन महीने उलटलेली ५७ कोटी रुपयांची नळपाणी योजनेचे काम केवळ उद्गघाटनासाठी रखडून ठेवण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात आले आहे सदरचे काम वेळीच सुरु न करा अन्यथा पालिकेला धडक द्यावी लागेल असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना दिला आहे.
श्री साळगावकर यांनी यासंदर्भात पत्रक प्रसिद्ध दिले आहे त्यात असे म्हटले की, सावंतवाडी शहराचा पाणी प्रश्न कायमचा मिटण्यासाठी राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत नळ पाणी योजना मंजूर होऊन आठ महिने उलटून गेले आहे. या योजनेसाठी तब्बल 57 कोटी रुपये मंजूर झाले आहे कुणकेरी पाळणेकोंड धरणावरुन ही योजना राबविण्यात येणार असून यामध्ये शहरातील संपूर्ण पाईपलाईन नव्याने टाकण्यात येणार आहे साठी शहरातील रस्ते खोदाई केली जाणार आहे त्यामुळे हे काम तात्काळ सुरू होणे गरजेचे आहे एकूणच उद्घाटना अभावी हे काम सुरू न करता रखडून ठेवणे सावंतवाडी त्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आहे पावसाळ्याआधी रस्ते खुदाई करून पाईपलाईन टाकून त्यावर डांबरीकरण झाल्यास चांगले होणार आहे. शहरातील काही रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम मंजूर आहे त्यामुळे हे काम पूर्ण व्हावे तर डांबरीकरण झाल्यानंतर पुन्हा रस्ते खोदाई झाल्यास रस्त्यांची वाट लागणार आहे मुळे असे न होण्यासाठी नळ योजनेचे काम सुरू होणे गरजेचे आहे त्यामुळे प्रशासनाने हे काम तात्काळ सुरू करावे अन्यथा आपल्याला पालिकेला धडक द्यावी लागेल असा इशारा दिला आहे
Home आपलं सिंधुदुर्ग तीन महीने उलटलेली ५७ कोटी रुपयांची नळपाणी योजनेचे काम केवळ उद्गघाटनासाठी रखडून...