सकल मुळीक परिवाराचे पाचवे स्नेहसंमेलन उद्या मळेवाडला शिवकालीन शस्त्र प्रदर्शन

सावंतवाडी,दि.१९ जानेवारी

सकल मुळीक परिवाराचे पाचवे स्नेहसंमेलन उद्या जिल्ह्यातील मळेवाड येथील संत गजानन महाराज मठात साजरे होत आहे. कोकणातील हे पहिले स्नेहसंमेलन आहे.

क्षत्रिय मुळीक परिवार संपूर्ण महाराष्ट्रासह देश विदेशात पसरला आहे. या समाजाच्या उन्नतीसाठी गेली काही वर्षे विविध भागात पसरलेले बांधव एकत्र येत आहेत. स्नेहसंमेलनाद्वारे एकमेकांच्या ओळखी होत असल्याने आता पर्यंत चार स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आली होती. पहिले स्नेहसंमेलन विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे पार पडले. त्यानंतर मुंबई, कोल्हापूर, पुणे (कोथरूड) येथे झालीत. .कोंकणात प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मळेवाड येथे पाचवे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.
उद्या सकाळी संत गजानन महाराज मठात सकाळी १०वाजता उद्घाटन करण्यात येईल. त्यानंतर धानोरा येथील फुगडी, केशव महाराज मुळीक यांचे कीर्तन,भजन, बालकलकरांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व रात्री ट्रिकसीनयुक्त दशावतारी नाटक आयोजित करण्यात आले आहे.. सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे सर्वांना पाहता येईल.