सावंतवाडी,दि.१९ जानेवारी
तळवडे मिरिस्तेवाडी परिसरात कमी दाबाचा वीज पुरवठा होत आहे त्यामुळे लोकांची विजेवर चालणारी घरगुती वापराची साहित्य खराब होत आहेत त्यामुळे शंभर केव्ही जनित्र बसवून द्यावे अन्यथा दि.२६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य सौ निकिता नारायण जाधव यांनी दिला आहे.
निकिता नारायण जाधव यांनी म्हटले आहे,तळवडे मिरीस्तेवाडी येथील तीन वाडीतील २०० च्या पुढे लोकवस्ती असलेल्या जोशी वाडी मिरीस्तेवाडी व मातोंड कडे कडील परबवाडी येथील ग्रामस्थांनी विद्युत पुरवठा कमी दाबाने होतो व विद्युत शेती पंप जळून शेतकऱ्यांचे नुकसान होते व घरातील उपकरणे जळतात असे सुचित केले त्यावर ग्रामपंचायत तळवडे च्या ग्रामसभेमध्ये चर्चा झाली व तसा ठराव दि.१५ एप्रिल २०१३ च्या सभेत पारित झाला व तो सरपंच यांचे पत्र विद्युत मंडळ कुडाळ चे अधिकारी व सावंतवाडीचे अधिकारी यांना देण्यात आला मी स्वतः १९ एप्रिल २०२३ रोजी पालकमंत्री सिंधुदुर्ग यांनाही दिला. तळवडे ग्रामपंचायतचे पत्र सुद्धा दिले ग्रामस्थांची मागणी ही 63kv ट्रान्सफॉर्मर हटवून त्या जागी शंभर केवीचा ट्रांसफार्मर बसवण्यात यावा ही आहे तरीसुद्धा अनेक वेळा विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांना कल्पना देऊन सुद्धा व लोकप्रतिनिधी यांना लेखी निवेदन देऊन सुद्धा हा ट्रान्सफर बदलण्यात आलेला नाही म्हणून मी दि.२६ जानेवारी च्या प्रजासत्ताक दिनी लोकांच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग ओरोस येथे सकाळपासून आमरण उपोषण करणार आहे