सावंतवाडी,दि.१९ जानेवारी
अयोध्या येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी भाजप युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष विशाल परब यांना निमंत्रण आले आहे. त्यामुळे २२ तारखेला होणाऱ्या सोहळ्यासाठी ते उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. अयोध्या येथे राम मूर्तीची स्थापना आणि मंदिराचा जीर्णोदराच्या मोठा कार्यक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित २२ तारखेला होत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आमंत्रण देण्यात आले आहे. यात सावंतवाडी भाजपचे युवा नेते विशाल परब यांना आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे ते त्या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
Home आपलं सिंधुदुर्ग अयोध्या येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी भाजप युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष विशाल परब यांना...