आजगाव साहित्य कट्ट्याचा ‘साहित्य जागर’

सावंतवाडी दि.१९ जानेवारी 
आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा एकोणचाळीसावा मासिक कार्यक्रम रविवार दिनांक २१ जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता ज्ञानदीप वाचनालय, गुळदुवे येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाद्वारे साहित्यजागर’ करण्यात येणार असून साहित्य कट्ट्याचे सदस्य कथा,कविता,ललित अभिवाचन आदी साहित्य प्रकार सादर करतील. या कार्यक्रमास मुंबईहूनही काही साहित्यप्रेमी उपस्थित रहाणार आहेत.
तरी या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी साहित्यप्रेमींनी जरूर उपस्थित रहावे, असे आवाहन साहित्य कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर आणि ज्ञानदीप वाचनालयाचे कार्यवाह अरुण धर्णे यांनी केले आहे.