सावंतवाडी दि.१९ जानेवारी
सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सावंतवाडी संस्थानाचे श्रीमंत बापूसाहेब महाराज आणि श्रीमंत शिवराम राजे साहेब यांचें शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले स्टॅच्यू स्वच्छता करून त्यावर अॅक्रीलिक कलर करण्याचे काम काम हाती घेतला आहे.
येत्या दोन दिवसात हे काम पूर्ण होणार आहे. यासाठी कित्येक दिवस या संस्थेच्या माध्यमातून नगरपालिकेचा लक्ष वेधण्यात आला होता तसेच ज्येष्ठ नागरिकांकडूनही मागणी होती सामाजिक बांधिलकीने हे हात कामे घेतल्यावर नागरिकांमध्ये एक समाधानाच वातावरण निर्माण झालेल आहे असे रवी जाधव यांनी सांगितले.यासाठी युवराज लखमराजे भोसले यांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केले आहे असे त्यांनी सांगितले.