नगराध्यक्षा दालनातील फोटोंवरून आकांडतांडव करणारे भाजपा नगरसेवक उपनगराध्यक्षांच्या दालनातील फोटोंबाबत गप्प का ?

केवळ सभागृहात प्रसिध्दीसाठी मोठमोठ्याने बोलून लक्ष वेधण्याचा भाजपा नगरसेवकांचा प्रयत्न

देवगड, दि.१९ जानेवारी(गणेश आचरेकर)

देवगड नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या दालनातील फोटोंवरून आकांडतांडव करणारे भाजपा नगरसेवक त्यांच्या बरोबर गेलेल्या उपनगराध्यक्षा सौ.मिताली सावंत यांच्या दालनात असलेल्या फोटोंबाबत गप्प का? असा सवाल देवगड जामसंडे मधील नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.नगराध्यक्षांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर त्यांचा दालना असलेले उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे फोटो यावरून विरोधी भाजपा नगरसेवकांनी आकांडतांडव केला होता मात्र उपनगराध्यक्षांच्या बाबतीत मुक गिळून गप्प का? असा सवाल व्यक्त होत आहे.

देवगड जामसंडे नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या दालनात त्या नगराध्यक्षा झाल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले होते.मात्र त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतरही उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे फोटो तसेच होते यावरून विरोधी भाजपा नगरसेवकांनी नगराध्यक्षांवर हल्लाबोल केला.शिंदे गटात प्रवेश करूनही उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे फोटो कसे असा सवाल करून नगराध्यक्षांना धारेवर धरले होते.त्यानंतर नगराध्यक्षांच्या दालनात आदित्य ठाकरे यांचा फोटो काढून तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटो लावण्यात आला होता.मात्र हेच आकांडतांडव करणारे भाजपाचे नगरसेवक आता गप्प आहेत.त्यांच्या सोबत गेलेल्या उपनगराध्यक्षा सौ.मिताली सावंत यांच्या दालनात राष्टवादीचे नेते शरद पवार यांचा फोटो आहे मात्र त्यांनी आ.नितेश राणे यांच्याबरोबर त्यांचा नगरसेवकांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर बरेच महीने झाले तरीही ना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा फोटो तसेच आ.नितेश राणे यांचा फोटो दालनात लावला. नाही दुस-यांना पक्षनिष्ठा शिकविणा-या व सभागृहात केवळ प्रसिध्दीसाठी भांडणाचा आव आणणा-या भाजपा नगरसेवकांना उपनगराध्यक्षांच्या दालनातील फोटो दिसले नाहीत का? का केवळ नगराध्यक्षांना वारंवार टार्गेट करून प्रसिध्दीच्या झोतात येवून आपण आपल्या वरिष्ठ नेत्यांना काहीतरी करून दाखवित आहे असा आव आणण्याचा प्रयत्न वारंवार भाजपा नगरसेवकांकडून होत असल्याची चर्चा सध्या देवगड जामसंडे मध्ये सुरू आहे.सभागृहात मोठ्याने बोलून पत्रकारांचे लक्ष वेधून प्रसिध्दी मिळविणा-या भाजपा नगरसेवकांनी जनतेमध्ये जावून आपल्याबाबत असलेल्या मतांचा, चर्चेचा मागोवा घ्यावा असे नागरिकांमधून बोलले जात आहे.