मतदाराला धमकावून खोटा जबाब घेतल्यास कणकवली पोलीस स्टेशनवर मोर्चा

आमदार वैभव नाईक यांचा कणकवली पोलिसांना इशारा

कणकवली दि.१७ मे(भगवान लोके)

महायुती चे उमेदवार नारायण राणे यांना मतदान करण्यासाठी पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या व्हिडिओ करणाऱ्या मतदाराला पोलिसांमार्फत धमकवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र पोलिसांनी राणेंच्या व भाजपच्या दबावाखाली जर त्या मतदाराचा खोटा जबाब घेतला व मतदाराला धमकावले तर गाठ आमच्याशी आहे असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.

तसेच पोलिसांनी या मतदाराला जबाब घेण्यासाठी बोलवले होते. मात्र प्रत्यक्षात पैसे वाटप करणाऱ्या कार्यकर्त्यांवर व उमेदवारावर गुन्हा दाखल करण्याची गरज असताना केवळ व्हिडिओ करणाऱ्या मतदाराला धमकी दाखवत पोलिसांमार्फत कारवाईची भीती घालण्यात येत असल्याने या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात येईल असा
इशारा देखील आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.