अपघातातील जखमींना पोलीस गाडीत घेऊन कासार्डे ग्रामीण रुग्णालयात केले दाखल
कणकवली दि.१७ मे(भगवान लोके)
मुंबई गोवा महामार्गावर दुपारी २.३० वा. च्या सुमारास तरळे पेट्रोल पंप समोर महामार्गावर गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारने पेट्रोल पंपावर येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. या जखमींना सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांनी तत्परतेने पोलीस गाडीत घेऊन कासार्डे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
यावेळी त्यांच्यासोबत पोलिस नाईक रुपेश गुरव, कॉन्स्टेबल राज आघाव, शिंदे व चालक राजू उबाळे हे देखील उपस्थित होते. अपघातात जखमी झालेले दुचाकी स्वार हे शिडवणे येथील असून दोघांचेही प्रकृती गंभीर आहे त्यामधील एकावर कणकवली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद नव्हती.