मायमाऊली सबलीकरण संस्थेच्या आरोग्य शिबिरात ४० महिलांची तपासणी

मालवण,दि.१७ मे

मालवण येथील मायमाऊली सबलीकरण संस्थेच्या वतीने जय भवानी वस्तीस्तर संघ देऊळवाडा यांच्या सहकार्याने मातृ दिनाचे औचित्य साधून मालवण देऊळवाडा येथील रामेश्वर मंदिर नजीकच्या अंगणवाडीत महिलांसाठी आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचा चाळीस महिलांनी लाभ घेतला. या शिबिरात CBC, थायरॉईड, कॅन्सर, HBA1C (मांसातील साखर) इत्यादी तपासण्या करण्यात आल्या.

या शिबिरात माय माऊली संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. वैशाली शंकरदास यांनी शिबिरात विषयी माहिती दिली. संस्थेच्या अध्यक्षा सौ. फॅनी फर्नांडिस यांनी संस्थेच्या माध्यमातून आपण महिलांच्या सबलीकरणासाठी कार्य करून महिलां मध्ये आत्मविश्वासा निर्माण करू अशी आशा व्यक्त केली. यावेळी जय भवानी वस्ती स्तर संघ ,देऊळवाडा, मालवण यांच्या अध्यक्षा सौ. नीना मुंबरकर यांनी महिलां करिता आरोग्य शिबीर हे फार महत्त्वाचे असून सातत्याने अशी आरोग्य शिबिरे होणे व महिलांनी आपल्या आरोग्या बद्दल काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन केले.

या शिबिरासाठी हिंद लॅब ग्रामीण रुग्णालय, मालवण यांचे सहकार्य लाभले. तसेच यावेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ. श्रमिका लुडबे, सचिव सौ. मिताली मोंडकर, खजिनदार सौ. राधिका मोंडकर, सहसचिव सौ. दीक्षा गावकर, सहखजिनदार सौ. मनीषा गावकर, संचालक सौ. मर्लीन मेंडिस, नेहा कोळंबकर, हिंद लॅब च्या लॅब असिस्टंट सौ. पूजा चव्हाण, श्री. सुनील खूपसे, जय भवानी वस्ती स्तर संघाच्या सचिव, CRP सौ. प्रणाली कवटकर, सौ. म्हापणकर, सौ. विद्या खानोलकर, सुजाता घाडी उपस्थित होत्या. आभार सौ. शंकरदास यांनी मानले.