छत्रपती एंटर प्रायजेस कडून दिव्यांगाना रोख रक्कमेचे वाटप

सावंतवाडी, दि.१९ जानेवारी
छत्रपती एंटर प्रायजेस सावंतवाडी कार्यालकडून काही दिवसांपूर्वी दिव्यांग बांधवाना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते त्याप्रमाणे आज १७ लोकांना प्रत्येकी एक हजार रुपयाप्रमाणे रोख रकमेचे वाटप करण्यात आले.
तसेच ज्या दिव्यांग बांधवानी, निराधार विधवा महिलांनी कागदपत्रे जमा केली होती अशा सर्व लोकांना २६ जानेवारीपासून त्यांच्या खात्यात १००० रुपये जमा करण्यात येणार असल्याचे छत्रपती एंटर प्रायजेस चे मुख्य संचालक श्री. पाटील यांच्या मार्फत सांगण्यात आले. ज्या दिव्यांग बांधवाना व्यवसायासाठी कर्जाची आवश्यकता असेल अशा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या दिव्यांग बांधवाना बिनव्याजी १०,००० ते २०,००० पर्यंत कर्ज देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी दोन दिव्यांग बांधवाना १०हजार आणि २० रु. कर्जाचे चे वाटपही करण्यात आले. त्याबद्दल दिव्यांग संघटनेकडून त्यांचे आभार माणण्यात आले. सदर प्रसंगी दिव्यांग सेना जिल्हा अध्यक्ष श्री. संजय देसाई, श्री. स्वप्निल लातये, श्री. अमित गोडकर, महेंद्र चव्हाण, घनश्याम पडते वगैरे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.