मालवण,दि.१९ जानेवारी
रोहा कोकण कृषी विद्यापीठ संशोधक डॉ. जितेंद्र कदम यांनी नुकतीच मालवण नगरपालिका कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी मान्यवरांचे स्वागत करून पालिकेतर्फे सन्मान केला. डॉ. कदम यांनी हळदीचे संशोधन करून पेटंट मिळविणे, श्रीवर्धन येथे सुपारी संशोधन व मानांकन, अलिबाग येथील प्रसिद्ध पांढऱ्या कांद्याचे भौगोलिक संकेत (Geographical Indication) जीआय मानांकन मान्यता मिळविणे आदींबाबत संशोधन केले आहे.
कोकण तसेच महाराष्ट्रात कृषी क्षेत्रात महत्वाची कामगिरी केली आहे. डॉ. जितेंद्र कदम यांनी या भेटी दरम्यान मालवण पालिकेने गेल्या तीन वर्षांत केलेल्या विविध विकासकामांची पाहणी तसेच स्वच्छताविषयक कार्यक्रमांचे सादरीकरण पाहिले. पालिकेने राबविलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.