देवगडात अनधिकृत जाहिराती, घोषणाफलक, होडिंग, पोस्टर्सवर कारवाई

नगरपंचायत मुख्याधिकारी सुरज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई…

देवगड, दि.१९ जानेवारी

शहरातील मांजरेकर नाका,कॉलेज नाका येथील सुमारे ३० अनाधिकृत होल्डिंग पोस्टरवर नगरपंचायत पथकाने कारवाई केली आहे अनधिकृत पणे लावण्यात आलेले अनाधिकृत होल्डिंग पोस्टर हटविण्यात आले आहेत ही कारवाई मुख्याधिकारी श्री.सुरज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
महाराष्‍ट्र शासनाचे वतीने ‘संपूर्ण स्वच्छता (Deep Cleaning) मोहीम राबवली जात आहे. देवगड जमसंडे नगरपंचायतीच्या वतीने देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्‍ये कॉलेज रोड ते देवगड बस स्‍थानक परीसरामध्‍ये सदर अभियान शुक्रवार दिनांक १९ जानेवारी, २०२४ रोजी राबविण्यात आले. तसेच उच्च न्यायालयात मुंबई यांच्याकडील अनधिकृत फलक होल्डिंग पोस्टरवर जनहित याचिका उच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार व महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन निर्णय नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या पथकामध्ये श्री.राघोबा धुरत, श्री.निल बांदिवडेकर, श्री.कुंदन घाडी, श्री.गुरुप्रसाद अदम, श्री.शिवप्रसाद गांवकर व इतर कर्मचारी सहभागी होते.