२०८१ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई
कणकवली दि.१९ जानेवारी(भगवान लोके)
कणकवली शहरात २०८१ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करत वाहतूक पोलिसांनी सन २०२३ या गेल्या वर्षभरात १४ लाख ९५ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.ही कारवाई वाहतूक पोलीस विनोद चव्हाण , राजाराम पाटील यांनी केली आहे.
त्यामध्ये विना परवाना वाहन चालविणे , वाहतुकीस अडथळा , वाहन थांबविण्याचा इशारा केला असता न थांबणे , दारू ( मध्यपान ) पिऊन वाहन चालविणे , विना इन्सुरेन्स वाहन चालविणे, विना P.U.C वाहन चालविणे , चारचाकी चालविताना सिटबेल्ट न लावणे , विना नंबरप्लेट वाहन चालविणे , फैन्सी नंबरप्लेट , दुचाकीवर ट्रिपल सिट जाणे , विना हेलमेट वाहन चालविणे , अवैदय प्रवासी वाहतूक करणे , ‘नोंदणीकृत वाहनामध्ये बदल करणे आदी विषयात नियम न पाळलेल्या वाहनचालक व वाहनांवर ही कारवाई करण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस अधिक्षक सिंधुदुर्ग , कणकवली उपविभागिय पोलीस अधिकारी व कणकवली पोलीस ठाणे अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.