पनवेल येथे आंदोलनात सहभागी होण्यासाठी अध्यक्ष सिताराम गावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

सावंतवाडी दि.१९ जानेवारी
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सावंतवाडी मराठा समाज बांधवांनी पाठिंबा दर्शविला असुन पनवेल येथे आंदोलनात सहभागी होण्याचे अध्यक्ष सिताराम गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले.

यावेळी आर पी डी हायस्कूल सभागृहात झालेल्या बैठकीत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले,सिताराम गावडे, सुंदर गावडे, आकाश मिसाळ, भिकाजी धोंड, प्रथमेश पनासे, नितीन गावडे, महादेव सावंत, आनंद धोंड, विजय देसाई, दीपक गावकर, राजू तावडे, शिवदत्त घोगळे, दिगंबर नाईक, प्रसाद राऊत, पुंडलिक दळवी, प्रवीण भोसले, उमाकांत वारंग, विलास जाधव, अभिषेक सावंत, मनोज घाटकर, गोविंद सावंत, प्रा. रुपेश पाटील आदी. उपस्थित होते.
सावंतवाडी तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी आपापल्या परीने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन सिताराम गावडे यांनी केले. यावेळी पनवेल व मुंबई आंदोलन स्थळी जाण्याचे नियोजन करण्यात आले