मालवणात ठाकरे शिवसेनेच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

बाळासाहेब ठाकरे जयंतीचे औचित्य ; ६७ रक्तदात्यांनी केले रक्तदान

मालवण, दि.१९ जानेवारी

हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मालवणच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मालवणच्या मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रक्तदान शिबिराला ६७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती कार्यक्रमांची सुरुवात रक्तदान शिबिराने करण्यात आली. लीलाधर पराडकर व आतु फर्नांडिस यांच्या स्मरणार्थ शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मालवण यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले.
याप्रसंगी ठाकरे शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतिन खोत, शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, गणेश कुडाळकर, सन्मेश परब,अमित भोगले,सेजल परब, देवयानी मसुरकर, पूनम चव्हाण, दीपा शिंदे, पूजा तोंडवळकर, रश्मी परुळेकर, नीनाक्षी शिंदे, हिना कांदळगावकर, सूर्वी लोणे, माधुरी प्रभू, उमेश चव्हाण, चंदू खोबरेकर, दिपक देसाई, तपस्वी मयेकर, प्रसाद चव्हाण, सचिन मालवणकर, आयवान फर्नांडिस, किशोर कासले, अमोल वस्त, सदा करंगुटकर, हेमंत मोंडकर, बंड्या सरमळकर, किशोर गावकर, मनोज मोंडकर, सतीश घाडी, सिद्धू जाधव, आशुतोष पाटील, पपू मुळीक, महेंद्र म्हाडगुत, संजय परब, मोहन मराळ, राजू मेस्त्री, दादा पाटकर, चिंतामणी मयेकर, सरपंच भगवान लुडबे, संतोष अमरे, अक्षय भोसले, अक्षय रेवंडकर, सरपंच संदीप हडकर, उपसरपंच हर्षद पाटील, राजा पेडणेकर, अमोल मांजरेकर यांसह रक्त पेढीच्या डॉ. पल्लवी सुरवले, अधीपरिचारिका प्रांजली परब, लॅब टेक्निशियन मयुरी शिंदे, नितीन गावकर, प्रथमेश घाडी, सुरेश डोंगरे आदी उपस्थित होते.