वृद्ध महिलेचा मृतदेह मालवण बंदर जेटी येथे सापडला त्या मृतदेहाची ओळख पटली

0

त्या महिलेची ओळख पटली

 

मालवण,दि.२० जानेवारी

मालवण बंदर जेटी येथील किनाऱ्यावर सापडलेल्या त्या वृद्ध महिलेची ओळख पटली असून तो मृतदेह श्रीमती सत्यवती अंकुश दाभोलकर (८५) हिचा असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वेंगुर्ला तालुक्यातील परुळे गवानवाडी येथील श्रीमती सत्यवती अंकुश दाभोलकर या काल शुक्रवारी परुळे बाजारात आल्या होत्या त्यानंतर त्या मालवण मध्ये आल्याचे पोलिसांनी सांगितले आज सकाळी मालवण बंदर जेटी येथील समुद्र किनाऱ्यावर एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याचे वृत्त फोटोसह सोशल मीडियावर पसरताच संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी मालवणला धाव घेतल्यानंतर त्या मृतदेहाची ओळख पटली याबाबत सत्यवान अंकुश दाभोलकर यांनीं पोलिसात खबर दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत