अयोध्या येथील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचे निमित्त*
*माजी सरपंच धोंडी चिंदरकर यांच्या संकल्पनेतून प्रथमच प्रभू श्री रामांच्या गाण्यावर भव्य नृत्य स्पर्धा*
आचरा,दि.२० जानेवारी (अर्जुन बापर्डेकर)
अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराचा पाचशे वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर सुवर्णक्षण सोहळा आपल्यां सर्वांना पाहण्याचा सुवर्णयोग लाभला आहे. पौष शुक्ल द्वादशी विक्रम संवत 2080 सोमवार 22 जानेवारी या शुभ दिनी श्री अयोध्या नगरीत प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची मंदिर गर्भगृहात प्राणप्रतिष्ठापना भव्य दिव्य अशा जल्लोषापूर्ण वातावरणात संपन्न होणार आहे. यावेळी अयोध्येसह देशभर आनंदमय वातावरण असणार आहे.
याच अनुषंगाने मालवण तालुक्यातील चिंदर मध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 8 वा. श्री देव रामेश्वर अभिषेक, सकाळी 9 वा. श्री राम महापूजा व अभिषेक, सकाळी 10 ते 12 वा. होम हवन व रामनाम जप, दुपारी 12 वा. नैवेद्य व अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा थेट प्रक्षेपण, दुपारी 1.30 वा. महाप्रसाद, दुपारी 3 वा. पासून गावातील विविध भजन मंडळाची भजने, सायं. 6. वा. हळदीकुंकू समारंभ, रात्रौ. 8 वा. माजी सरपंच श्री. धोंडी चिंदरकर यांच्या संकल्पनेतून प्रथमच प्रभू श्री राम यांच्यावर आधारित गाण्यावर भव्य खुली एकेरी व समूहनृत्य स्पर्धा स्थळ-चिंदर, श्री देव रामेश्वर मंदिर येथे होणार आहे.
एकेरी नृत्य स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक- 5000/- व चषक, द्वितीय क्रमांक -3000/- व चषक, तृतीय क्रमांक -2000/- व चषक, उत्तेजनार्थ 1000ची दोन बक्षीसे व चषक,
समूह नृत्य स्पर्धा- प्रथम क्रमांक-10,000 व चषक,
द्वितीय क्रमांक :- 7000 व चषक, तृतीय क्रमांक 5000 व चषक, उत्तेजनार्थ 2000 ची दोन बक्षीसे व चषक, अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. अधिक माहितीसाठी उपसरपंच श्री. दिपक सुर्वे-8408090151, सरपंच-स्वरा पालकर-9404194740, तंटामुक्ती अध्यक्ष, संतोष गांवकर-9420721819 यांच्याशी संपर्क करावा.
गावातील, पंचक्रोशीतील, राम भक्तांनी या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हा असे आवाहन चिंदर ग्रामस्थ, बारापाच मानकरी आणि रामभक्त यांनी केले आहे.