वेलें फौजदारवाडी रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ

0

सावंतवाडी,दि.२० जानेवारी
सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या शिफारशीनुसार वेर्ले, फौजदारवाडी रस्त्याचे डांबरीकरणाचे नुतनीकरण करणे रु. २० लक्ष निधी मंजूर केला असून, त्यांचा शुभारंभ शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला

यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री. प्रेमानंद देसाई, शिवसेना तालुकाप्रमुख श्री. नारायण राणे, संजयगांधी निराधार समिती अध्यक्ष श्री. गजानन नाटेकर, वेर्ले सरपंच सौ. सुचिता राऊळ, उपसरपंच श्री. मोहन राऊळ, ग्रा.पं. सदस्य सौ. पल्लवी राणे, श्री. दिलीप राऊळ, श्री.बाळा गावडे, श्री. लाडजी राऊळ, श्री. चंद्रकांत राऊळ, श्री. सुनिल राऊळ, श्री. सुभाष राऊळ, श्री.सुरेश राऊळ, श्री.ज्ञानदेव लिंगवत, श्री. प्रितेष राऊळ, श्री.अब्जू सावंत, श्री. संदेश सोनुर्लेकर, श्री. एकनाथ हळदणकर, श्री. सदा कदम, आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.