सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार ‘प्रशस्त’ कडून करिअरचे मार्गदर्शन.!

0

23 जानेवारी रोजी सावंतवाडीत मोफत सेमिनारचे आयोजन,
विद्यार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन.

सावंतवाडी,दि.२० जानेवारी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इयत्ता दहावी तसेच अकरावी, बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. पुणे येथील नामांकित ‘प्रशस्त’ या करिअर मार्गदर्शन शिबिराचे संपूर्ण जिल्ह्यात आयोजन करण्यात आले असून त्याची सुरुवात 23 जानेवारी रोजी सावंतवाडी येथून होणार आहे.

सावंतवाडी येथील तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांना, करिअरच्या विविध संधी समजाव्यात या उद्देशाने, सावंतवाडी शहरातील राणी पार्वती देवी हायस्कूल तथा ज्युनिअर कॉलेज तसेच श्री पंचम खेमराज महाविद्यालय येथे पुणे येथील नामांकित विचार एज्युकेशन मार्फत, करिअर मार्गदर्शन शिबिराचे दिनांक 23 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता आयोजन केले आहे.
तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

सदर शिबिराचे आयोजन विचार एज्युकेशनचे डायरेक्टर इंजि. विवेक गुप्ता (बी. टेक – आयआयटी, मद्रास) यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे.
तसेच सिंधुदुर्गचे सुपुत्र, आयआयटी मद्रास येथून एरोनॉटिकल इंजिनिअरिंग पदवी प्राप्त प्रा. राजाराम परब, विचार एज्युकेशन पुणे, यांच्यामार्फत, मार्गदर्शन करणार आहेत. तसेच स्पर्धा परीक्षा सल्लागार प्रा. रुपेश पाटील, विचार एज्युकेशनचे सहकारी श्री. संदीप दिघे, यांचा देखील सहभाग असणार आहे.
तरी मंगळवारी दिनांक २३ जानेवारी रोजी सावंतवाडी शहरातील राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे सकाळी 10 वाजता आणि एसपीके महाविद्यालयात सकाळी 11.30 वाजता सदर सेमिनार आयोजित केले आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.