वैश्यवाडा, सावंतवाडी येथील श्री हनुमान मंदीरात श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित भरगच्च कार्यक्रम

0

सावंतवाडी,दि.२० जानेवारी
वैश्यवाडा, सावंतवाडी येथील श्री हनुमान मंदीरात श्री राम जन्मभूमी अयोध्या येथील श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. यासाठी मंदिर परिसरात जय्यत तयारी सुरू आहे.

दि. २२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता गुढी पूजन १०.३० वाजता श्री ना अभिषेक, दुपारी ११ ते १ वाजेपर्यंत महाआरती, त्यांनतर दुपारी २.३० वाजे पर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ६.३० वाजता दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री हनुमान मंदिर उत्सव समिती तर्फे कऱण्यात आली आहे.