अपूर्ण अवस्थेत मंदिराचे काम असताना घाईगडबडीत श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचा घाट का- डॉ.जयेंद्र परुळेकर

0

सावंतवाडी दि.२० जानेवारी
अपूर्ण अवस्थेत मंदिराचे काम असताना घाईगडबडीत अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचा घाट का घातला जात आहे हे न समजणे एवढी जनता खुळी नाही केवळ निवडणुका जिंकण्यासाठीच हा सर्व खटाटोप सुरू असल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते डॉ.जयेंद्र परुळेकर यांनी लगावला.
तर पौष महिन्यात कुठलेही शुभकार्य हिंदू धर्मात केले जात नाही मग अयोध्या येथील हा कार्यक्रम याच महिन्यात का आयोजित केला असे त्यांनी उपस्थित करत मंदिर हे केवळ भाजपचे नाही तर असंख्य हिंदूंच्या आस्थेचे स्थान आहे त्यामुळे प्रभू श्रीरामाचा अपमान करू नये असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
श्री परुळेकर यांनी आज येथे पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला ते म्हणाले संपूर्ण देशात अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे वातावरण तयार करण्यात आले आहे भाजप, संघ परिवार, विश्व हिंदू परिषद घरोघरी जाऊन याबाबत प्रचार करत आहेत मुळात मी हिंदू धर्माला मानतो हिंदू धर्मावर माझी आस्था आहे श्रीराम जय राम जय जय राम हा माझा जयघोष आहे परंतु अयोध्या येतील कार्यक्रम भाजपाकडून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केला जात आहे हे चुकीचे आहे मुळात सद्यस्थितीत मंदिराचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे मंदिराचा गाभारा हा आत्म असून मंदिर हे ईश्वराचे शरीर आहे मग अशा अपूर्ण अवस्थेत उद्घाटन करणे हे हिंदू धर्मात अशुभ आहे आदी शंकराचार्याच्या मार्गाने हिंदू धर्म शतकोवर्ष चालत आला आहे. हिंदू धर्मामध्ये भविष्य महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचे शुभकार्य केले जात नाही मग अशुभ घडीला प्राणप्रतिष्ठापना करण्याची घाई नेमकी कशासाठी एकूणच हे सगळे चित्र लक्षात घेता देशात राजकीय हिंदू वेगळे असून हिंदू बाबत असता असणारे वेगळे आहेत हे स्पष्ट होते.
ते पुढे म्हणाले भाजपाकडून महागाई बेरोजगारी आत्महत्या अशा विविध मुद्द्यांना बगल देण्यासाठी अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा मुद्दा पुढे करण्यात आला आहे मुळात देशातील महागाई बेरोजगारी आत्महत्या व अन्य भेडसावणाऱ्या प्रश्नावर निवडणुका होणे गरजेचे असताना 2019 मध्ये ज्याप्रमाणे पुलवामा येथील हल्ला एक प्रकारे घडवून आणला होता तसाच प्रकार आता अयोध्या येतील कार्यक्रमाच्या माध्यमातून घडवून आणला जात आहे मात्र आज जनता जरी भोळी असली तरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये ती नक्कीच भाजपाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. कारण दुसरीकडे ही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल पाहता जनतेमध्ये रोष आहे जनता फक्त वोटिंग मशीन मधील बटन दाबण्याची वाट पाहत आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही पुन्हा निवडून येणार नाही.

चौकट..
दीपक केसरकर ठाकरे शिवसेनेमध्ये असताना आपण प्रॉपर्टी विकून राजकारण करत असल्याचे सांगत होते. परंतु याच केसरकरांकडे आता मोठ मोठे होल्डिंग लावण्यासाठी पैसे आले कुठून असा सवाल डॉ.परुळेकर यांनी उपस्थित करत खोक्यांचे झालेले आरोप खरे की खोटे याचा हिशोब जनतेनेच करावा. केसरकर हे निश्चितच पुन्हा निवडून येणार नाही आयत्यावेळी तिसरा चेहरा या ठिकाणी विजयी होईल असाही दावा त्यांनी यावेळी केला.