सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी च्या कळसुलकर शाळेला डिंगे कुटुंबीयांकडून शाळेच्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी चार लाखाची देणगी.

0

सावंतवाडी दि.२० जानेवारी
कळसुलकर शाळेचे माजी विद्यार्थी अजित श्रीधर डिंगे यांच्या स्मृति प्रित्यर्थ श्री. विठ्ठल तथा विजय श्रीधर डिंगे आणि बंधु भगिनी शाळेच्या इमारत नूतनीकरणासाठी चार लाखाची देणगी दिल्याबद्दल संस्थेच्या वतीने डिंगे कुटूंबियांचा गौरव करण्यात आला.
कायँक्रमाचे प्रास्ताविक सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे ओंकार तुळसुलकर यांनी केले. संस्थेच्या कामकाजाचा आढावा सचिव डाँ.प्रसाद नावेँकर यांनी घेतला. मेळाव्याच्या बहर स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. स्मरणिकेसाठी योगदान देणारे राजेश मोंडकर, प्रसाद महाले यांचाही संस्थेतफेँ सत्कार करण्यात आला.
कायँक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ.बांदेलकर-भोसले यांनी केले. मेळाव्यास संस्था उपाध्यक्ष मोहन वाडकर, खजिनदार मुकूंद वझे, सहसचिव गौरांग चिटणीस, संचालक रवींद्र स्वार, अण्णा म्हापसेकर, राजश्री टिपणीस,श्रध्दा नाईक, सेवानिवृत्त शिक्षक, माजी विद्याथीँ अँड.दिलीप नावेँकर, मालवणी कवी दादा मडकईकर, माजी अध्यक्ष राजन पोकळे, माजी नगरसेवक जनाँदन पोकळे, बाळ चोडणकर आदी उपस्थित होते.