राजवाडा परिसरात येत्या २८ जानेवारी रोजी “लोककला महोत्सवाचे” आयोजन

0

सावंतवाडी दि.२० जानेवारी
सावंतवाडी राजवाडा परिसरात येत्या दि .२८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता “लोककला महोत्सवाचे” आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी प्रभारी प्राचार्य एम. ए. ठाकूर, प्रा. दिलीप गोडकर, डॉ. बी.एन. हिरामणी, डॉ. गणेश मर्गज, प्रा. बाळासाहेब नंदीहळळी, राजेंद्र बिर्जे, अण्णा देसाई व बाळू धुरी आदी उपस्थित होते.
या महोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले, कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, युवराज्ञी सौ. श्रध्दाराजे भोंसले, संस्थेचे संचालक प्रा.डी.टी.देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, नियामक मंडळाचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत आदि उपस्थित राहाणार आहेत.
सहयोग ग्रामविकास मंडळ गरड, माजगाव व श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता राजवाडा येथील पटांगणावर “लोककला महोत्सवाचे” आयोजन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध लोककलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने व येथील लोककला टिकाव्यात व त्या वृदधींगत व्हाव्यात या हेतूने राजवाडा सावंतवाडी येथे सहयोग ग्रामविकास मंडळ, माजगाव व श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते १०.३० वा “लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित लोककला मंडळे यांच्या कळसुत्री बाहुल्यांचा खेळ, छायानाट्य, राधानृत्य, चित्रकथी, गोंधळ, गोफनृत्य, चपई नृत्य, समई नृत्य, वासुदेव, पांगुळबैल अशा लोककलांचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले, महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री ना. श्री दिपक केसरकर, संस्थेच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, युवराज्ञी सौ. श्रध्दाराजे भोंसले, संस्थेचे संचालक प्रा. डी.टी.देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत आदी उपस्थित राहाणार आहेत.
या लोककला महोत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत लोककलावंत सहभागी होणार आहेत. यामध्ये राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त, संगीत नाटक अकादमी भारत सरकारचा गुरुवर्य सन्मान प्राप्त, तसेच महाराष्ट्र राज्य आदिवासी गिरीजन राज्य सांस्कृतीक पुरस्कार प्राप्त श्री.बाळकृष्ण गणपत मसगे यांचे दयती लोककला संवर्धन अकादमी, पिंगुळी ता. कुडाळ यांचे कळसुत्री बाहुल्यांचा, चामड्याच्या बाहुल्यांचा शो, राधानृत्य, चित्रकथी, गोंधळ,
तसेच श्री गणेश लांबर यांचे अंबाई सिध्दाई चपई नृत्य ग्रुप परुळे, ता. वेंगुर्ले, तसेच श्री विनायक जोशी यांचे संत लालाजी महिला समई नृत्य ग्रुप मठ, ता. वेंगुर्ला, सौ. विलासिनी नाईक यांचा सोमेश्वर महिला मंडळ वेतोरे, ता. वेंगुर्ला गोफ नृत्य ग्रुप सहभागी होणार आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.