सावंतवाडीच्यावतीने ‘दशावतार महोत्सवाचे’ २४ जानेवारी रोजी राजवाडा परिसरात आयोजन

सावंतवाडी दि.२० जानेवारी 
कोकणातील दशावतार कला ही जगप्रसिद्ध आहे. ही लोककला सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी श्री पंचम खेमराज महाविद्यालय, करण्यात आले आहे.
सावंतवाडी राजवाड्याच्या निसर्गरम्य सुंदर वातावरणातील पटांगणात दि.२४ ते २७ जानेवारी या कालावधीमध्ये सायंकाळी ६.३० ते रात्री १० वाजेपर्यंत ‘दशावतार महोत्सव ‘ होणार असून या महोत्सवाचे उदघाटन बुधवार दि. २४ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता करण्यात येणार आहे.
याबाबतची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रभारी प्राचार्य एम. ए. ठाकूर, प्रा. दिलीप गोडकर, डॉ. बी.एन. हिरामणी, डॉ. गणेश मर्गज, प्रा. बाळासाहेब नंदीहळळी, राजेंद्र बिर्जे, अण्णा देसाई व बाळू धुरी आदी उपस्थित होते.
या महोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले, कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, युवराज्ञी सौ. श्रध्दाराजे भोंसले, संस्थेचे संचालक प्रा.डी.टी.देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, नियामक मंडळाचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत आदि उपस्थित राहाणार आहेत.
दशावतार महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून जिल्ह्यातील विविध दशावतारी मंडळाना व कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या दशावतार महोत्सवात बुधवार दि. २४ रोजी सायंकाळी ६.३० ते रात्री ८ पर्यंत जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ आरोस – दांडेली यांचा ‘ टप्केश्वर तीर्थक्षेत्र’ तर रात्री ८.३० ते १० पर्यंत वालावलकर दशावतार नाट्य मंडळ ओसरगांव यांचा ‘ लक्ष्मी पूजन ‘ हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.
तर गुरुवार २५ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० ते ८ चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ चेंदवण यांचा ‘ अजिंक्य मणी’ तर रात्री ८.३० ते १० कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर यांचा पराशक्ती दहन हा नाट्यप्रयोग होणार आहे.
शुक्रवार २६ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० ते ८ आरोलकर दशावतार नाट्य मंडळ आरवली यांचा ‘शिवमहिमा ‘ तर रात्री ८.३० ते १० वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ तेंडोली यांचा ‘ अघोर लक्ष्मी ‘ हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.
तर महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी २७ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० ते ८ दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा ‘ मीनाश्री सुंदरेश्वर ‘ तर रात्री ८.३० ते १० नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ मोचेमाड यांचा ‘ गणेश मंगळ युद्ध ‘ हा पौराणिक नाट्य प्रयोग होणार आहे.