उपजिल्हा रुग्णालय परिसरामध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होण्याबाबत राजघराणे व महाराष्ट्र सरकार यांच्यात समझोता

सावंतवाडी दि.२० जानेवारी 

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय परिसरामध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होण्याबाबत राजघराणे व महाराष्ट्र सरकार यांच्यात समझोता झाला आहे त्याबाबत राज्य सरकारच्या कॅबिनेट मध्ये ठराव झाला आहे मात्र न्यायालयातील तांत्रिक बाबी पूर्ण होण्याचे बाकी आहे ते झाल्यानंतरच हॉस्पिटलच्या प्रश्नाबाबत पुढील निर्णय होईल अशी माहिती युवराज लखमराजे भोसले यांनी दिली.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय परिसरामध्ये मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ला मंजुरी मिळाली असून या प्रॉपर्टी बाबत न्यायालयांमध्ये प्रकरण प्रलंबित आहे. त्यामुळे राजघराण्याने या जमिनी बाबत तोडगा काढण्यासाठी सरकारकडे मागणी केली. सरकारने त्याबाबत कॅबिनेटमध्ये ठराव घेतलेला आहे मात्र न्यायालयात वाद प्रलंबित असल्याने त्या ठिकाणी राजघराणे आणि सरकार यांच्यात समझोता झाल्याचे परिपूर्ण कागदपत्र सादर केल्यानंतरच पुढील निर्णय होईल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यासाठी प्रयत्न केले आहेत आता न्यायप्रविष्ठ प्रकरण असल्यामुळे तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर जमिनी बाबतचा निर्णय होऊन हॉस्पिटलचे काम सुरू होईल असे युवराज लखमराजे भोसले यांनी सांगितले.