आयुष्याच्या स्पर्धेत पुढे जात असताना शाळेला कधीही विसरु नये-देवदत्त गव्हाणकर

सावंतवाडी दि.२० जानेवारी 
आयुष्याच्या स्पर्धेत पुढे जात असताना शाळेला कधीही विसरु नये. माजी विद्यार्थ्यांची जिव्हाळ्याची पावले पुन्हा शाळेकडे वळावीत, असे प्रतिपादन स्टेट बँकेचे (मुंबई) अधिकारी देवदत्त गव्हाणकर यांनी कळसुलकर हायस्कूलच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात केले.

कळसुलकर हायस्कूलच्या सभागृहात नुकताच माजी विद्यार्थी मेळावा झाला. कायँक्रमास व्यासपीठावर माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष द.म.गोठोस्कर, सावंतवाडी एज्युकेश सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पै, कळसुलकर शाळेचे मुख्याध्यापक एन.पी.मानकर, कळसुलकर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत, जेष्ठ उद्योजक विजयसिंह शिरगावकर(मुंबई), वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचे वामन पंडीत उपस्थित होते.

श्री.गव्हाणकर म्हणाले, माजी विद्यार्थी म्हणून शाळेत निमंत्रित करण्यात आले. माझा आतापर्यंतचा जो प्रवास आहे, त्याचे श्रेय या शाळेच्या शिक्षकांचे आहे. काळानुरूप कळसुलकर शाळा वेग साधते आहे, बदल करत आहे;याचे समाधान वाटते.
ते म्हणाले, पूर्वी शालेय जीवन होते. आता जीवन हीच शाळा आहे आणि अनुभव हा गुरु आहे. आपण रोज काही तरी शिकत असतो. आयुष्याच्या स्पधेँत पुढे जात असतांना खरी स्पधाँ स्वतःशीच आहे. शिकण्याचा हा प्रवास आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरु राहाणार आहे. शिकण्याची हि जडणघडण ज्या शाळेतून झाली त्या शाळेला कधी विसरू शकणार नाही.
यावेळी 1968च्या बँचने देणगी स्वरूपात 75हजार रुपयांचा धनादेश संस्थेस सुपूर्त केला. कळसुलकर शाळेतील विद्यार्थ्यांना क्रिडा विषयक मागँदशँन करणारे अरुण भिसे, जितेंद्र म्हापसेकर, आनंद शिशुवाटिकेच्या सौ.नम्रता नेवगी,युवा उद्योजक तथा शाळेचे दाते राजेंद्र शहा, देणी उभारणी योगदान देणारे सेवानिवृत्त शिक्षक संतोष वैज, देणगीदार तथा माजी अध्यक्ष रमेश पई यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.