परूळे येथे २३ रोजी ‘गीत रामायण‘

वेंगुर्ला ,दि.२० जानेवारी

लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी नेहमीच समाजपयोगी उपक्रम राबवत असते. याचाच एक भाग म्हणून सर्वांचे श्रद्धास्थान असणारे प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येत श्री रामांच्या जन्मस्थानी त्यांच्या मूर्तीची पुनर्स्थापना होत आहे. हा आनंदक्षण साजरा करण्यासाठी २३ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता श्री आदिनारायण मंदिर, परूळे येथे ‘स्वरवैभव‘ क्रिएशन या संस्थेच्या कलाकारांचा ‘गीत रामायण‘ हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.