वेंगुर्ला ,दि.२० जानेवारी
स्नेहसंमेलनातून विद्यार्थी घडत असतात. आपल्यातील कलागुण ओळखून विद्यार्थ्यांनी समरसतेने जर क्षेत्र निवडले तर त्यांना पुढील कालावधीमध्ये करिअर निवडणे सोपे जाते असे प्रतिपादन कलावलयचे उपाध्यक्ष संजय पुनाळेकर यांनी केले.
येथील प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले. यावेळी महिला उद्योजिका सीमा नाईक, बी.के.सी.असोसिएशनचे अध्यक्ष सतिश डुबळे, कलावलयचे अध्यक्ष सुरेंद्र खांबकर, उपाध्यक्ष संजय पुनाळेकर, बॅ.खर्डेकर कॉलेजचे प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले, माजी प्राचार्य डॉ.आनंद बांदेकर, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, विद्यार्थी प्रतिनिधी चिन्मय पेडणेकर, निधी पालकर उपस्थित होते.
कोल्हापूर येथील शिक्षण प्रसारक मंडळाने प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूल स्थापन केल्यामूळे गरजू विद्यार्थ्यांना एक संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे आपण या संधीचा फायदा घ्यावा व जेवढे ज्ञान विद्यार्थ्यांना घेता येईल त्यासाठी पालकांनी प्रयत्न करावा, असे आवाहन सीमा नाईक यांनी केले. स्वागत मुख्याध्यापक मिताली होडावडेकर, प्रास्ताविक कु. केतकी चेंदवणकर, सुत्रसंचालन कु.निधी पालकर, कु. स्वरुपा आईर तर आभार कु. प्रथमेश प्रभूतेंडोलकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.