नारायण राणेंच्या उपस्थितीत मंदिर स्वच्छता अभियान कार्यक्रम

वेंगुर्ला ,दि.२० जानेवारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले मंदिर स्वच्छता अभियान १४ जानेवारीपासून सुरू झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर २१ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता वेंगुर्ला सातेरी मंदिर येथे केंद्रीय मंत्री नारायण राण, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांच्या उपस्थितीत मंदिर स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे