हातगाडीवरून रुग्णालयात नेलेल्या रुग्णाची अर्चनाताई घारे परब यांनी घेतली भेट

वेंगुर्ला,दि.२० जानेवारी
नेवाळेवाडी,भोगवे : वेंगुर्ले तालुक्यातील पर्यटनदृष्ट्या महत्वाच्या अशा भोगवे ग्रामपंचायत हद्दीतील नेवाळेवाडी येथे गेली ३५ वर्षे रस्ता व्हावा यासाठी प्रयत्न करणारे मधुकर केळुसकर काही दिवसांपूर्वी आजारी पडले होते. तेव्हा त्यांनाचा हातगाडीवरून रुग्णालयात नेण्याची वेळ आली होती. वर्तमान पत्रात फोटोसह तसी बातमी प्रसिद्ध झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ.अर्चना घारे परब यांनी मधुकर केळुसकर यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

‘शासन आपल्या दारी’ म्हणत शासन लाखोंचा खर्च करून मोठा महोत्सव भरवत असते. हजारो लोक येऊन लाभ घेत असल्याचे सांगण्यात येते. दुसरीकडे तळकोकणात आजही रुग्णांना झोळी करून, हात गाडी वरुण दवाखान्यात उपचारासाठी न्यावे लागत आहे. ही शरमेची बाब आहे. तळकोकणातील आरोग्य सुविधांबाबत शासन आणि लोक प्रतिनिधी अत्यंत उदासीन आहेत. याचा अनेकदा प्रत्यय आला आहे. अनेक उदाहरणे आपण साध्या पाहत आहोत. याकडे शासन आणि लोक प्रतिनिधी यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात नागरिकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल. अशी भावना यावेळी अर्चनाताई यांनी व्यक्त केल्या. यावेळी त्यांच्यासोबत vengurla तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष योगेश कुबल, सावंतवाडी विधानसभा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विवेक गवस, vengurla तालुका उपाध्यक्ष बबन पडवळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

एकीकडे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव धूमधडाक्यात साजरा होत आहे, त्यातच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असताना सर्वसामान्यांच्या हाल कुणीही पाहत नाही. गावाला रस्ता नाही, शाळा नाही, दुर्गम भागातून इथल्या रुग्णांना झोळीतून अथवा हातगाडीवरून न्यावे लागते. प्राथमिक आरोग्य केंद्र जवळपास नसल्याने रुग्णाची हेळसांड होतं आहे. सर्वच रुग्णांना आरोग्य उपचारासाठी रस्त्याअभावी झोळी शिवाय, हातगाडीशिवाय पर्याय नाही, अशा परिस्थितीत ग्रामस्थ आपल्या समस्यांना नेहमीच वाचा फोडत असताना याकडे कुणाचे लक्ष नसल्याचे दुःख मधुकर केळुसकर यांनी अर्चनाताई घारे परब यांच्या जवळ यावेळी व्यक्त केल्या.