कणकवलीत अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महाआरती

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते कार सेवकांच्या २२ जानेवारीला सत्कार

कणकवली दि.२० जानेवारी(भगवान लोके)

अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी पार पडत आहे. सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभर अनेक धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन केले जात आहे.

त्यानुसार कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते कणकवली मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी ७ वाजता महाआरती करण्यात येणार आहे. त्यानंतर १९९२ साली कार सेवक म्हणून अयोध्येला गेलेल्या मतदारसंघातील मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर रात्रौ ९ वाजता प्रभू श्रीरामाच्या रामलीलांचे दशावतारी नाट्य सादर करण्यात येणार आहे.

श्रीरामलल्ला मुर्ती प्राण प्रतिष्ठापना अयोध्या सोमवार २२ जानेवारी २०२४ रोजी सायं. ४ वा. – संगीत भजने,सायं. ५ वा. – आदर्श संगीत विद्यालय प्रस्तुत भक्ती संगीत ‘ध्यान लागले रामाचे’,सायं. ७ वा. – महाआरती,रात्रौ ७.३० वा. – कारसेवकांचा सत्कार,रात्रौ ८ वा. – चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग रामभक्त अंजनी होणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन आमदार नितेश नारायण राणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत.