मालवण ,दि.२० जानेवारी
राज्य परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या व सिंधुदुर्ग विभागात कधी काळी काम केलेल्या अशा अधिकारी व कर्मचारी यांचे व त्यांच्या कुटुंबीयांसोबत सहावा स्नेहमेळावा कुडाळ येथील मराठा समाज हॉल मध्ये साजरा झाला. हा स्नेहमेळावा चंद्रकांत देशपांडे व विष्णुपंत कोरगावकर यांच्या संकल्पनेतून संपन्न झाला.
या स्नेहमेळाव्याच्या कार्यक्रमाची सुरुवात सौ. मनिषा पाताडे यांच्या स्वागतगीताने झाली. त्यांना श्रीमती तरुबाला ठाकूर यांची साथ लाभली. विठ्ठल राणे, सुरेश बिले, चंद्रसेन जाधव, सौ. वनिता वरुणकर, सिने नट श्याम नाडकर्णी, तातू नवार, श्रीमती श्रद्धा आरेकर, चंद्रकांत मुंज इत्यादींनी गाणी गायली. विकास कुलकर्णी साहेब यांनी भैरवी म्हटली.
त्यानंतर सर्वांच्या सहभागातून विविध खेळ सौ. नीता गोवेकर यांनी घेतले. त्यांना सुनिल मठकर यांची साथ लाभली. सौ. पडवळ, दिगंबर सावंत, राम सरनोबत, सौ. पाटील आणि श्री. वाईरकर हे बक्षिसांचे मानकरी ठरले. परीक्षण श्री. शाहू भोसले यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पांडुरंग राणे यांच्या गायनाने झाली. सुनिल शिंदे, दिलीप भांडारकर यांचे पूर्ण कार्यक्रमात सहकार्य राहिले.
सूत्र संचालन ग्रुपचे ॲडमिन प्रकाश गोवेकर यांनी केले. या स्नेहमेळाव्याला मुंबई, पुणे, खेड, रत्नागिरी, निपाणी, कोल्हापूर व सिंधुदुर्ग विभागातील मंडळी उपस्थित होती. मोहनदास खराडे, गौरव गोसावी, सुहास राटुळ, शाहू भोसले,विकास कुलकर्णी, सुरेश बिले, शिवाजी चव्हाण, भास्कर कुडतरकर, सौ. प्रियदर्शनी आडकर आदी सेवानिवृत्त अधिकारी तसेच पुण्याचे अनंतराव देसाई, नाट्य दिग्दर्शक सुहास वरुणकर, सेवानिवृत्त संघटनेचे पदाधिकारी बाबा आरोलकर आदी उपस्थित होते.