वायरी बांध येथील दत्त मंदिरात २२ रोजी विविध कार्यक्रम

0

मालवण ,दि.२० जानेवारी

अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या श्री राम मंदिरात दि. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मालवण वायरी बांध येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर या ठिकाणी परमपूज्य श्री सद्गुरू सदानंद माऊली महाराज सांप्रदायाच्यावतीने सांप्रदायाचे प्रमुख पूजनीय विलास (बापूजी) झाड यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

यावेळी सकाळी ११ ते १२ वा. सामुदायिक श्रीराम रक्षा स्तोत्र पठण, दुपारी १२.०० वा. अयोध्येतील प्रतिष्ठापना सोहळ्याचे भव्य पडद्यावर थेट प्रक्षेपण, दुपारी १२.४५ वा. महाआरती दुपारी १.१५ वा. महाप्रसाद आणि दीपोत्सव असे कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्व राम भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सांप्रदायाचे कार्याध्यक्ष श्री. कृष्णा बांदेकर यांनी केले आहे.