- कणकवली दि.२० जानेवारी(भगवान लोके)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील कूपवडे येथे राष्ट्रवादी चषक क्रिकेट स्पर्धेचे २० जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे.या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी कूपवड़े व त्या पंचक्रोशी मधील राष्ट्रवादीचे प्रमुख बंटी परब, स्वप्निल परब, भाऊ परब व राष्ट्रवादी कुडाळ तालुका अध्यक्ष आर. के. सावंत, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर गुरूजी, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, राष्ट्रवादी ओ. बी. सी. जिल्हाध्यक्ष सर्वेश पावसकर,राष्ट्रवादी जिल्हा प्रतिनिधि अमित केतकर, केदार खोत व पंचक्रोशी मधील राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते.