हुशार व होतकरू विद्यार्थिनीस आर्थिक मदतीची गरज

0

सावंतवाडी दि.२० जानेवारी
वि. स. खांडेकर विद्यालय, सावंतवाडी या विद्यालयातील इ. १० वी मध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी कु. स्वानंदी दशरथ गावकर हि अत्यंत गंभीर अशा आजाराने त्रस्त आहे.तिला आर्थिक मदतीची गरज आहे.

या विद्यार्थ्यांनीला स्वादुपिंडाचा विकार असून तिच्यावर सध्या मुंबईमधील लोकमान्य टिळक हॉस्पिटल ( सायन हॉस्पिटल ) या ठिकाणी उपचार सुरु आहेत. त्या उपचारास ती चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र मुंबईसारख्या ठिकाणी इतके दिवस राहून उपचार घेण्याचा खर्च परवडण्यासारखा नाही. या मुलीचे पालक मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत आहेत आतापर्यंत दोन लाख रुपयांच्या वर खर्च आला असून अजून सुमारे चार ते पाच लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

कु. स्वानंदीचे वडील श्री. दशरथ आप्पा गावकर हे झाराप, ता. कुडाळ, येथील रहिवासी असून गेल्या काही वर्षापासून सावंतवाडी (भटवाडी) येथे आपल्या कुटुंबासह राहून मोलमजुरी करीत आहेत. जर अपेक्षित खर्च केला तर स्वानंदीसारखी हुशार व होतकरू विद्यार्थिनी निश्चितच बरी होईल. एक हात मदतीचा करून आपण सर्वानी तिला आर्थिक मदत केल्यास या गंभीर आजारातून लवकर बरे होण्यास तिला मदत होईल. याकरिता समाजातील दानशूर व्यक्ती व सर्वानीच तिला मदत करावी हि विनंती करण्यात आली

मदतीकरिता खालील मोबाइल क्रमांकावर गुगल पे द्वारे मदत व संपर्क करावा.श्री. दशरथ आप्पा गावकर :- 9112172330 (GPAY)
या ठिकाणी मदतीचं हातभार लावावा असे वि स खांडेकर विद्यालयाने आवाहन केले आहे.