सावंतवाडी,दि.२० जानेवारी
अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या उद्घाटन महोत्सवाच्या निमित्ताने इस्कान सावंतवाडी सेंटरच्या वतीने रविवार दि. २१ जानेवारी रोजी हरे कृष्ण संस्कार केंद्र, भटवाडी, सावंतवाडी येथे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ‘श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी बेळगांव येथील उस्कान मंदिराचे प्रवचनकार श्रीमान माधवचरण प्रभू यांचे रामायणावर प्रवचन होणार आहे. त्यानंतर सर्वासाठी एकादशीप्रसादाचे आयोजन आहे.
तसेच सोमवार दि. २रजानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता ‘हरिनाम संकिर्तन फेरी’ होणार आहे. हि फेरी उभाबाजार विठ्ठल मंदिरपासून सुरु होऊन गांधी चौक, नगरपालिका मार्गे जगन्नाथराव मोसले उद्यानापर्यंत असणार आहे. यामधे प्रभु श्रीरामचंद्र, सीता, लक्ष्मण व हनुमान यांची वेशभूषा, किर्तन, आरती, दिपदान व सर्वांसाठी प्रसाद असे आयोजन करण्यात अलि आहे.
त सावंतवाडीतील सर्व नागरीकांनी या भक्तिमय उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) यांच्या सावंतवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.