कबड्डी स्पर्धेतून भविष्यात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू घडतील: समीर नलावडे

0

कणकवली,दि.२० जानेवारी 

कबड्डी हा लाल मातीतला खेळ आहे. हा खेळ खेळणाऱ्यांसाठी अभय राणे मित्रमंडळाने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करून त्यांना मैदान उपलब्ध करून देत आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. या मित्रमंडळाच्या कबड्डी स्पर्धेतून भविष्यात राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय कबड्डीपटू तयार होतील, असा आशावाद माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी व्यक्त केला.

अभय राणे मित्रमंडळातर्फे टेंबवाडी येथे एआरएम चषक २०२४ कबड्डीचा महासंग्राम या स्पर्धेचे आयोजन केले आहे या स्पर्धेचे उद्द्घाटन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झाले याप्रसंगी श्री. नलावडे बोलत होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे, उद्योजक राजू गवाणकर, माजी नगरसेवक अभय राणे, शिशीर परुळेकर, संतोष राणे, मंडळाचे अध्यक्ष ओमकार राणे, युवामोर्चा शहराध्यक्ष सागर राणे, विठ्ठल कांदळकर, अमिता राणे, रवी जोगळे, धनंजय कसवणकर, विजय इंगळे, अक्षय पेंढुरकर, अवधूत तळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री व कलमठ उपसरपंच स्वप्नील चिंदरकर यांनी भेट देत मंडळाला शुभेच्छा दिल्या.

श्री. नलावडे म्हणाले, आजची पिढी सोशल मीडियावर फार सक्रिय असते या पिठीला मैदान खेळ घेण्यासाठी पालक व क्रीडा स्पर्धा आयोजित करणाऱ्या आयोजकांनी प्रोत्साहित केले पाहिजे, कबड्डी स्पर्धा आयोजित करण्याचा अभय राणे मित्रमंडळाचा क्रीडा विषयक उपक्रम स्तुत्य असून यापुढील काळात मंडळाच्या प्रत्येक उपक्रमास आपले सहकार्य असेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्पर्धेसाठी कबड्डीपटूंना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले. यावेळी कबड्डीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.