कुडाळमध्ये शिवसैनिकांच्या वतीने श्री राम नामाचा जल्लोष

0

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूकीसह राममंदिरात महाआरती*

कुडाळ, दि.२० जानेवारी

अयोध्येत २२ जानेवारी रोजी होत असलेल्या प्रभू श्री राम यांच्या मूर्ती प्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आज कुडाळ शहरात भव्य मिरवणूक काढून श्रीराम मंदीरात महाआरती करण्यात आली. शिवसेना शाखा कुडाळ ते म्हापसेकर तिठा पिंगुळी येथून कुडाळ बाजारपेठ मार्गे श्रीराममंदीर हॉटेल गुलमोहर पर्यंत श्री राम यांच्या प्रतिमेची मिरवणूक व मोटारसायकल रॅली काढली. यावेळी शिवसैनिकांनी श्री राम नामाचा जयघोष करीत जल्लोष साजरा केला. मिरवणुकीत राम, सीता, लक्ष्मण, आणि हनुमान यांचा चित्ररथ देखावा सादर करण्यात आला होता. यामुळे कुडाळ शहरात उत्साहाचे वातावरण होते.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुका प्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, माजी उपसभापती जयभारत पालव, शहर प्रमुख संतोष शिरसाट, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, उपतालुकाप्रमुख सचिन कदम, महिला तालुकाप्रमुख स्नेहा दळवी,मथुरा राऊळ, माजी सभापती श्रेया परब, कुडाळचे शिवसेनेचे नेते अतुल बंगे,युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,सचिन काळप, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका श्रेया गवंडे, ज्योती जळवी, श्रुती वर्दम, सई काळप, राजू कविटकर, शेखर गावडे,रामा धुरी, रमाकांत ताम्हाणेकर,नरेंद्र राणे, गंगाराम सडवेलकर,विकास राऊळ, बंड्या कुडतरकर, संदीप म्हाडेश्वर, दीपक आंगणे, बाळू पालव, सुशील चिंदरकर,नितीन सावंत, मंजू फडके, मिलिंद नाईक, संतोष अडुलकर,राजू गवंडे,अशपाक कुडाळकर, वैशाली पावसकर,दिनेश वारंग,विनय गावडे, रुपेश वाडयेकर, प्रदीप गावडे, शैलेश घाटकर, गुरु गडकर, अमित राणे, आदींसह शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिक व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.