नांदगाव युवा पुरस्कृत रेकॉर्ड डान्स स्पर्धा

0

 

कणकवली दि.२० जानेवारी(भगवान लोके)

तालुक्यातील नांदगाव तिठा येथे युवा पुरस्कृत नांदगाव आयोजित १ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हा अंतर्गत रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

लहान गट १२ वर्षाच्या आत वैयक्तिक डान्स- प्रथम पारितोषिक- रुपये ३००० व चषक, द्वितीय पारितोषिक- रुपये २००० व चषक, मोठा गट १२ वर्षाच्या वरती वैयक्तिक डान्स – प्रथम पारितोषिक रुपये५००० व चषक, द्वितीय पारितोषिक रुपये ३००० व चषक, ग्रुप डान्स खुला – प्रथम पारितोषिक रुपये ३००० व चषक देवून गौरविण्यात येणार आहे.

सदर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व गटाकरिता रुपये १०० प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. तसेच स्पर्धा रात्री ९.३० वाजता चालु करण्यात येईल. स्पर्धेसाठी पंचांचे निर्णय अंतिम राहिल.तसेच प्रथम येणा-यांना प्राधान्य देण्यात येईल.स्पर्धेत नाव नोंदण्यासाठी संपर्क क्रमांक-जाफर बटवाले – ९४०४४४९२६६/८४५४०७८५१२, श्री. रफिक जेठी- ९६७३३६७४५९ यांच्याशी संपर्क साधावा.