वागदे श्री आर्यादुर्गा मंदिरात धार्मिक कार्यक्रम

0

 

कणकवली दि.२० जानेवारी(भगवान लोके)
श्री दुर्गापासक ऐक्यवर्धक संघ
वागदे व वागदे ग्रामस्थ
ता. कणकवली यांच्यावतीने श्री प्रभु रामचंद्र मंदिर प्रतिष्ठापना सोहळा निमित्त सोमवार दि. २२ जानेवारी रोजी श्री आर्यादुर्गा मंदिर वागदे येथे खालील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी १० ते १२ वा. पवमानपंचसूक्त व रुद्रानुष्ठान सेवा आणि श्री राम जय राम जय जय राम जप सेवा.
संध्या ४.३० ते ६.३० वा.रामनाम जप / रामरक्षा / दीपोत्सव व आरती – तीर्थप्रसाद
तरी सकलजनानी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री दुर्गापासक ऐक्यवर्धक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.