सरपंच संघटनेचे अध्यक्ष हनुमंत पेडणेकर यांची भूमिका
सावंतवाडी,दि.२० जानेवारी
सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला सावंतवाडी सरपंच संघटनेचा पूर्ण पाठींबा आहे, अशी भूमिका सावंतवाडी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा मळगांव सरपंच हनुमंत पेडणेकर यांनी जाहिर केली आहे.
सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम बरेच वर्ष रखडलेले आहे ते लवकरात लवकर पुर्ण होण्यासाठी रेल्वे स्थानकात सिंधुदुर्गातील जनता आणि रेल्वे प्रवासी संघटना प्रजासत्ताक दिना दिवशी म्हणजेच २६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजल्यापासुन आंदोलन करणार आहे. त्या आंदोलनाला जास्तीत जास्त संख्येने लोकांनी सहभागी व्हावे,
असे आवाहनही त्यांनी केले आहे.
सावंतवाडी टर्मिनसच काम सुरु करून या स्थानकात सर्व गाड्यांना थांबा द्यावा आणि कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या सर्व मागण्यांसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेसोबतच सरपंच संघटनाही आंदोलनात सहभागी होईल, असेही त्यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.