सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर फोंडाघाट मध्ये भारत- पाकिस्तान युद्धात अतुलनीय कार्य करणाऱ्या ऐतिहासिक रणगाड्याला मानवंदना देत स्वागत !

0

ग्रामस्थ व फोंडाघाट कॉलेज -हायस्कूल च्या एनसीसी कॅडेट कडून रणगाड्याला मानवंदना

फोंडाघाट,दि.२० जानेवारी (संजय सावंत)
सन १९७१ मधील भारत- पाक युद्धात अविस्मरणीय कामगिरी करून सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक ठरलेला ऐतिहासिक रणगाडा पुणे (खडकी) येथून बॅ.नाथ पै सेंट्रल स्कूल- कुडाळ यांना देण्यात आला असुन या रणगाड्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरील फोंडाघाट एसटी स्टँड येथे फोंडाघाट महाविद्यालयाचे एनसीसी कॅडेट आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या एनसीसी विभागाने रणगाड्याला मानवंदना देऊन सोबत असलेल्या मान्यवरांचे भव्य स्वागत असून यानंतर भारत माता की जय ! वंदे मातरम !भारतीय सैनिकांचा विजय असो ! अशा बुलंद घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता यावेळी फोंडाघाट च्या उपस्थित नागरिकांनीही जोरदार साथ दिली. यावेळी फोंडाघाट ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि छात्र सेनेच्या वतीने कुमार नाडकर्णी यांनी ऐतिहासिक रणगाड्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले.
दरम्यान यावेळी पर्यटन विकासात भर पाडण्यासाठी सदैव कार्यरत असणारे उमेश गाळवणकर,व्यंकटेश भंडारी, शेखर सावंत, यांच्या नेतृत्वाखाली वैशाली गोठवणेकर ,सायलीन वारंग, प्रणाली मयेकर,सुमंत करंगळे,प्रकाश कानडे, संतोष पडते,भाग्यश्री भोगटे,नचिकेत देसाई आणि नाथ पै शाळेचे एनसीसी छात्र उपस्थित होते.
यावेळी ऐतिहासिक वसा लाभलेल्या या रणगाड्याची शौर्यगाथा सांगताना लेफ्टनंट डॉ. प्रा. राज ताडेराव म्हणाले,पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांचे काळात भारत-पाक युद्धात जनरल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैनिकांनी केलेल्या पराक्रमाला या रणगाड्याने अविस्मरणीय साथ दिली होती. यामुळे फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी, ५८ बटालियन, एनसीसी सिंधुदुर्ग व हायस्कूल एनसीसी विभाग यांचे वतीने या ऐतिहासिक रणगाड्याचे स्वागत करण्याचे भाग्य आम्हाला लाभले हे आमचे नशीब समजतो. यावेळी ऑफिसर आर्या भोगले, फोंडाघाट हायस्कूल पर्यवेक्षक प्रसाद पारकर,मारुती लाड, संतोष रायबोले, आयुष सावंत इत्यादी उपस्थित होते.
फोंडाघाट चा इतिहासात एक “अविस्मरणीय क्षण” असा उल्लेख या ऐतिहासिक रणगाड्याचे स्वागत करताना प्रत्येक फोंडावासीयांच्या मनात रुजेल. कारण प्रवेशद्वारावरील स्वागत सदैव प्रेरणादायी आणि भविष्यात ऊर्जा देणारे ठरते. सैनिकांची शौर्यगाथा या ऐतिहासिक रणगाड्या मधून नाथ पै हायस्कूल कुडाळ येथे नक्कीच जपली जाईल. तसेच पर्यटन विकासासाठी अधोरेखतही होईल. मात्र शौर्याचे पावित्र्य हे सुद्धा तशाच भावनेतून जपले गेले पाहिजे. असे उदगार स्वागत प्रसंगी बोलताना कुमार नाडकर्णी यांनी काढले.व नाथ पै स्कूल कुडाळ च्या भाग्याचे कौतुक केले.आणि हा स्वागत सोहळा- फोंडावासीयांकडून, सरपंच, गावातील संस्था आणि ग्रामस्थांच्या वतीने होत असल्याचे आवर्जून सांगितले.त्या स्वागत प्रसंगी बहुसंख्य ग्रामस्थ- अबाल वृद्धांनी उपस्थित राहून गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार झाल्याची भावना व्यक्त केली. त्यानंतर रणगाडा रॅली कणकवली येथे रवाना झाला