राज्यभरातील मुळीक बांधवांनी स्नेहसंमेलनाद्वारे दाखवलेली एकी इतर समाजासाठी आदर्शवत: विनायक राऊत

0

पुढील स्नेहसंमेलन सातारा जिल्ह्यात*

सावंतवाडी,दि.२० जानेवारी

सकल मुळीक परिवाराचे पाचवे स्नेहसंमेलन आज उत्साहात मळेवाड येथील संत गजानन महाराज मठात साजरे झाले. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी हजेरी लावत मुळीक परिवाराचे अभिनंदन करीत आपला मुळीक परिवारात ऋणानुबंध असल्याचे सांगत शुभेच्छा दिल्या.

क्षत्रिय मुळीक परिवार संपूर्ण महाराष्ट्रासह देश विदेशात पसरला आहे. या समाजाच्या उन्नतीसाठी गेली काही वर्षे विविध भागात पसरलेले बांधव एकत्र येण्यासाठी स्नेहसंमेलनाद्वारे एकत्रित आणण्यात आले. आजच्या संमेलनाला सातारा जिल्ह्यातील सातारा,अनपटवाडी, आणेवाडी,वाई, पाटण, सांगली जिल्ह्यातील वाटेगाव, शाळा, कराड, कडेगाव, पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड,बारामती, कोथरूड, पुरंदर, सासवड, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, अमरावती जिल्ह्यातील अमरावती, बडनेरा, अकोला, कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर शहरासह चंदगड, आंबेवाडी, उत्तूर, किणी,भादवण,आजरा, सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर,करमाळा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे, आंब्रड,पागावाडी, सावंतवाडी,दोडामार्ग, धाकोरा, कोंडुरा,मळेवाड, आजगाव, आदी भागातील मुळीक बांधव आले होते
आज सकाळी संत गजानन महाराज मठात सकाळी १०वाजता विविध भागातून आलेल्या मुळीक बांधवांकडून शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
त्यानंतर धाकोरा येथील फुगडी, केशव महाराज मुळीक यांचे कीर्तन,भजन, बालकलकरांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व रात्री ट्रिकसीनयुक्त दशावतारी नाटक आयोजित करण्यात आले होते. यावेळी मुळीक परिवाराची माहिती असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.तसेच https://mulikparivar.co.in/ हि वेबसाइट हि लॉंच करण्यात आली.
यावेळी शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पुढील स्नेहसंमेलन अनपटवाडी (सातारा) येथे आयोजित करण्यात येणार आहे.