दोडामार्ग, दि. २० जानेवारी
गोवा दोडामार्ग कोल्हापूर बेळगाव मार्गावथर असलेला तिलारी घाट हा मौत का कुआ
म्हणून ओळखला जातो. या घाटातून अवजड वाहने यांना बंदी असताना शाॅटकट गोवा येथे जाण्यासाठी या घाटाचा वापर केला जातो. यामुळे अनेक अपघात वारंवार घाट बंद होणे नित्याचेच बनले आहे. पण बांधकाम विभाग चंदगड पोलिस प्रशासन काही करत नाही. शनिवारी पहाटे विशाखापट्टणम येथे कोळसा भरून गोवा येथे जाणारा सोळा चाकी ट्रकची धोकादायक वळणावर कपड्याला धडकून घाट रस्ता सात तास बंद झाल्याने एस टी बसेस खाजगी वाहने अडकून पडली अखेर दोन क्रेन बोलावून हा ट्रक मागे ओढून दुपारी साडेबारा वाजता वाहतूक पूर्ववत केली. प्रशासनाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. बांधकाम विभाग यांनी तातडीने अवजड वाहने न रोखल्यास आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. या अपघातामुळे सात तास घाट बंद राहिला.