श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा व उदघाटन सोहळा या निमित्ताने ग्रामदेवतांकडे विविध कार्यक्रम आयोजित

0

मालवण दि.२० जानेवारी

अयोध्येत येथे नवनिर्मित श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा व उदघाटन सोहळा या निमित्ताने सोमवारी दिनांक २२ जानेवारी रोजी मालवणच्या ग्रामदेवतांकडे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

दिनांक २२ जानेवारी रोजी श्री देव नारायण मंदिरात सकाळी ९ वाजता अभिषेक व ११ ते दुपारी १:३० या वेळात रामनाम जप तसेच रामरक्षा पठण व आरती. श्री देव रामेश्वर मंदिरात सकाळी ११ ते दुपारी १:३० या वेळेत अभिषेक, रामनाम जप, रामरक्षा पठण व आरती. तसेच श्री देवी पावणाई मंदिर, शश्री देवी भावई मंदिर, श्री देवी सातेरी मंदिर या मंदिरांमध्ये दुपारी १:३० वाजता घंटानाद व आरती करण्यात येईल. दुपारी २ वाजता रामेश्वर मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तर सायंकाळी ५ वाजता श्री देव नारायण मंदिर येथे गायनाचा कार्यक्रम होईल व ६:३० वाजता दीपोत्सव साजरा करण्यात येईल तरी सर्वांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.