ग्रामीण रुग्णालयातील रक्तपेढी तातडीने सुरू न केल्यास या प्रजासत्ताक दिनी संघटनेच्या वतीने आमरण उपोषण

0

देवगड,दि.२० जानेवारी

देवगड ग्रामीण रुग्णालयातील रक्तपेढी तातडीने सुरू न केल्यास या प्रजासत्ताक दिनी संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

या पत्रकार परिषदेसाठी या संघटनेचे तालुकाध्यक्ष हिराचंद तानवडे, उपाध्यक्ष प्रवीण जोग, सचिव प्रकाश जाधव, जिल्हा कार्यकारणी सदस्य विजयकुमार जोशी उपस्थित होते

केवळ एमबीबीएस वैद्यकारी वैद्यकीय अधिकारी हा या रक्तपेढीचा इन्चार्ज हवा अशी अट आहे. देवगडमध्ये डॉक्टर विटकर यांच्या वतीने हा उपलब्धही आहे. प्रभारी चार्ज त्याच्याकडे देऊनही रक्तपेढी सुरू करता येईल, मात्र शासन टाळाटाळ का करत आहे. असा प्रश्न पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी त्यांनी शासनाला दिलेले निवेदन पत्रकार परिषदेत दिले ते पुढील प्रमाणे ग्रामीण रुग्णालय देवगड येथे सन 2015 साली ब्लड स्टोरेज सेंटर मंजुर झालेले आहे परंतु ते आजमिती पर्यंत आठ वर्षे एवढा प्रदीर्घ कालावधी होऊन सुद्धा का कार्यान्वित होऊ शकले नाही है अनाकलनीय आहे.

सध्यस्थीतीत देवगड मध्ये ग्रामीण रुग्णालय व खाजगी हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात होत असुन यावेळी रक्त व रक्त घटक यांची नितांत गरज भासते अशावेळी देवगड पासुन जाऊन येऊन 200 कि. भी अंतर पार करून कमी वेळात रक्त किंवा रक्त घटक उपलब्ध होणे अडचणीचे व खर्चिक ठरत असून गंभीर रुग्णांच्या जीवाला धोका उत्पात्र होऊ शकतो याची जबाबदारी कोणाची ?

मंजुर ब्लड स्टोरेज सेंटर विना विलंब तात्काळ सुरु करण्यात यावे व रुग्णांची होणारी गैरसोय पत्र मिळाल्या पासुन आठ दिवसांच्या आत दूर करण्यात याची हि विनंती.

या बाबत आपल्याकडून दिरंगाई झाल्यास संपूर्ण देवगड तालुक्यातील रुग्णांच्या हीतासाठी आम्हाला नाईलाजाने 26 जानेवारी रोजी आपल्या कडून अपेक्षित कायवाही न झाल्यास आम्ही आमच्या संस्तेच्या माध्यमातून प्रामीण रुग्णालय देवगड येथे आमरण उपोषणाला बसणार आहोत याची नोंद घ्यावी असे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे

शासनाने ही रक्तपेढी सुरू करण्याबाबत योग्य ती कार्यवाही सुरू केल्यास पदाधिकारी उपोषणावर ठाम आहेत