देवगड,दि.२० जानेवारी
अयोध्या श्री राम मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त मळई येथील हनुमान मंदीरामध्ये २२ जानेवारी रोजी आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे यानिमत्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जामसंडे मळई येथील बाल मंडळ संगीत मेळा मळई या मंडळामरर्त हनुमान मंदीर येथे आनंदोत्सव साजरा करण्यात येणार असून या निमित्त सोमवार दि.२२ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता श्रींची पूजा, ११ वाजता महाआरती, दुपारी ३ वा.महीलांसाठी हळदीकूंकू कार्यक्रम, ३.३० वा.रामनाम जप, रामरक्षा पठण व श्रींच्या मूर्तीवर अभिषेक, सायंकाळी ५.३० वा.महाआरती व तिर्थप्रसाद, सायंकाळी ६ वा.पासुन दीपोत्सव, ७ वाजता स्थानिक भजने व रात्री ८ वाजता फाटाक्यांची आतषबाजी व कार्यक्रमाची सांगता होणार आहे.या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.