परमेश्वराने दिलेली सुंदर जबाबदारी म्हणजे दिव्यांग मूल! : सौ शरयू घाडी यांचे प्रतिपादन

0

परमेश्वराने दिलेली सुंदर जबाबदारी म्हणजे दिव्यांग मूल! : सौ शरयू घाडी यांचे प्रतिपाद

दिव्यांग मुलांसाठी “दिव्यानंद” कार्यक्रमाचे आयोजन

मसुरे,दि.२० जानेवारी (झुंजार पेडणेकर)

राष्ट्रीय बालश्री पुरस्कार प्राप्त प्रसाद नागेश घाडी याच्या स्मृती प्रित्यर्थ, दिव्यांग बालकांना प्रेरणा आणि आनंद देणारा दिव्यानंद कार्यक्रम मालवण चिवलाबीच धुरीवाडा मालवण येथे आयोजित करण्यात आला होता. आपण किती जगलो यापेक्षा कसे जगलो हा महत्वाचा विचार देणारी प्रेरणा या कार्यक्रमा द्वारे देण्यात आली आहे. खरा तो एकची धर्म दिव्यांगाना प्रेम अर्पावे. याच बरोबर दिव्यांग मूल हे परमेश्वराने आपल्यावर विश्वास ठेवून दिलेली सुंदर जबाबदारी आहे. ती आपण आनंदाने स्विकारली पाहीजे, म्हणजे परमेश्वरही आपणास नक्कीच मदत करतो असे प्रतिपादन समाजसेविका सौ शरयू नागेश घाडी यांनी यावेळी केले.
दिव्यांग मुलांच्या जीवनात आनंद यावा यासाठी मागील चार वर्षे सौ. शरयू नागेश घाडी आणि देवसख्या ग्रूप हा कार्यक्रम आयोजित करतात. उपस्थित मुलाचे स्वागत, प्रसादची प्रेरणा देणारा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त माहीतीपट, मुले आणि पालकांसाठी आनंद देणा-या कलाकृती, बक्षीसे, भेटवस्तू, स्नेहभोजन असे कार्यक्रमाचे स्वरूप होते.
यावर्षी दिव्यानंद कार्यक्रमाचे आयोजन मालवण तालुक्यातील दिव्यांग मुले तसेच अनाथाश्रमातील मुले यांच्यासाठी करण्यात आले होते.
आपल्या दिव्यांगत्वावर मात करून अनेक कलांमध्ये प्रविण्य मिळवत असलेल्या सावंतवाडीच्या सोहम साळगावकर ह्या बालकराकाराने गायन करीत सर्वांना आनंद दिला.
या कार्यक्रम प्रसंगी मालवण गटशिक्षण अधिकारी श्री माने, आणि त्यांचे सहकारी शिक्षक उपस्थित होते. समाजसेवक डॉक्टर दिघे यांनी दीप प्रज्वलन करून शुभारंभ केला. ह्या कार्यक्रमासाठी मुंबईच्या संध्या शानभाग, संगीता सावंत, राधिका कांबळी, स्मिता सावंत, अलका करंबेळकर मानसी माजगावकर, सुरेखा देशपांडे, सुजाता जोशी, अलका कामत, अस्मिता सुतार, सुरेखा तावडे, विजयालक्ष्मी डेरे, सपना चौकेकर, नितीन लाड, नागेश घाडी या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.