फोंडाघाट,दि.२१ जानेवारी (संजय सावंत)
प्राध्यापक पदासाठी सेट किंवा नेट ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या या परीक्षेत यश म्हणजे शिक्षकी पेशातला एक मैलाचा दगड असतो हा मैलाचा दगड पार करताना फोंडाघाट येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील कॉमर्स विषयाच्या सहाय्यक प्राध्यापिका कु. कीर्ती पाटील यांनी डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या नेट परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केले.याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
प्रा. कीर्ती पाटील या 2022 पासून कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटमध्ये कॉमर्स शाखेत सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थी प्रिय प्राध्यापिका असा त्यांचा परिचय आहे. नेहमी सकारात्मक राहून ज्ञानसाधना आणि ज्ञानदान या प्रति सजग राहणाऱ्या, स्वभावातच प्रशासकीय गुण असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला मिळालेले यश हे खूप महत्त्वाचे मानले जाते.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. त्याचबरोबर संस्थेचे चेअरमन श्री. सुभाष सावंत, सेक्रेटरी श्री. चंद्रशेखर लिंग्रस, खजिनदार श्री. आनंद मर्ये व सर्व संचालक मंडळ तसेच महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य यांनीही